कै. देवराम भाऊवाळुज बहुभाषिक सभागृह व ज्येष्ठ नागरिक संकुल उदघाटन- लोकार्पण सोहळा संपन्न -
अंबरनाथ । प्रतिनिधी: अंबरनाथ पश्चिम भागातील वार्ड क्र. २२ मधील तत्कालीन आराखड्यातील सुनियोजित महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी परिसर गेल्या अनेक दशकांपासून सर्वच क्षेत्रात चर्चेत असताना दरम्यान कालात विकासाची मोठी पडझड झाली होती. एक अभ्यासू आणि अनुभवी भाजपा नगरसेवक सुनिल सोनी यांनी नागरिकांना काय हवयं याची जाणिव घेऊन आधुनिक विकासाच्या संकल्पनेतुन सुसज्ज अशा दुमजली इमारती तीन कक्षात रचना करुन उभारलेल्या . देवरामभाऊ वाळंज बहुभाषीक सभागृहाचे लोकार्पण श्रीमती विमल देवराम वाळूज यांच्या हस्ते करण्यात आले तर उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते अध्ययावत व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी येथील नागरिकांना पाच लाखापर्यंतच्या आयुष्यमान भारत योननेअंतर्गत आरोग्य कार्ड वितरीत करण्यात आले. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी श्यामराव पाटील नगर परिसरातील जेष्ठ नागरिकांना आपल्या कार्यक्रमासाठी हक्काची जागा मिळावी हि तळमळ गेली कित्येक वर्षांपासून माझ्या मनाला सतावत होती. सद्सदविवेक आणि सद्सदबुध्दीने प्रभागातील विकासाला जोड देत नागरिकांनी सतत केलेल्या सुचनांचा आदर आणि सहकार्यातुन आज दुमजली इमारतीमध्ये तिन कक्षात कै.देवरामभाऊ वाळूज बहुभाषीक सभागृह, महिलांच्या उद्योगासाठी राखीव जागा, सार्वजनिक कार्यक्रमासाठी तसेच तरुणांना व्यायामास प्रोत्साहन म्हणून अध्ययावत साहित्ययुक्त बंदिस्त व्यायाम शाळा आता तरुणांसाठी खुली होणार sliआहे. या बहुसमाजपयोगी वास्तुचे लोकार्पण करताना मला माझ्या आयुष्यातील अत्योच्च आनंद होत असल्याचे भाजपा नगरसेवक सुनिल केदार सोनी यांनी प्रास्ताविक माहिती देताना सांगितले. अंबरनाथ पश्चिम भागातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनीत गेल्या अनेक वर्षानंतर एका नव्या बहुभाषीक सभागृह, जेष्ठ नागरिक कक्ष व व्यायाम शाळेचे भव्य स्वरुप साकारल्याचा आनंद जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष रामराव सुतार यांनी व्यक्त केला या लोकार्पण सोहळ्यात अशोक चव्हाण इव्हेंट प्रस्तुत मनोरंजन कार्यक्रमात बाळा या गाण्यावर बॉलिवुड कलाकारांची हुबेहुब नक्कल वनिता हरी या महिला कलाकारांनी सादर केली.
अंबीका योग कुटीर ठाणे या संस्थेने योगा प्रात्यक्षिक धडे दिले. कराटे कोच अनिल गायकवाड यांनी तायक्वोंदो कलाही बचावात्मक कला आहे कोणाला मारण्यासाठी नाही. मुळची भारतातुन गेलेली कला कोरीयामध्ये विकसित झाल्याचे सांगितले. अंबरनाथमधील महेश सर आणि त्यांच्या टिमने तायक्वोंडो प्रात्यक्षिक करुन दाखविले. समाजसेवक मनोहर झुंज आणि त्यांचे सहकारी, शिवप्रेमी मित्रमंडळ, महिला मंडळ आणि नागरिकांच्या हस्ते नगरसेवेक सुनिल सोनी यांचा हदय सत्कार केला यावेळी अंबरनाथ पालिकेचे उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, श्रीमती विमल वाळूज, जोस्ना सोनी, भाजपचे शहराध्यक्ष राजेश कौठाळे, प्रमोद कांबळे वंसत चव्हाण, जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष रामराव सुतार, फेस्कॉम कोकण प्रदेश विभागाचे अध्यक्ष श्या.गो.पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ,सहायक पोलिस आयुक्त विनायक नराळे,आदि मान्यवर तसेच परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.